ताज्या घडामोडी
Trending
शिरूर नगरपालिकेच्या नाकाखाली मंगलमूर्ती नगरचा ‘वनवास’ कधी संपणार..?
दोन महिन्यांपासून रस्ता रखडला; नागरिकांचा संयम सुटला, आता थेट आंदोलनाचा इशारा..!!

-
“टॅक्स वसुलीत ‘सुसाट’, कामात ‘निवांत’; शिरूर नगरपालिकेचा मंगलमूर्ती नगरमध्ये ‘टाईमपास’ सुरू!”
**शिरूर (प्रतिनिधी):**
शिरूर नगरपरिषद कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या **मंगलमूर्ती नगर**मधील रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून नरकयातना सोसाव्या लागत आहेत. नागरी सुविधांची वानवा, रखडलेली विकासकामे आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे येथील नागरिकांचा वनवास संपण्याचे नाव घेत नाहीये.
“निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो, पण काम मात्र शून्य,” अशी संतप्त भावना सध्या नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासक राज गेले, लोकप्रतिनिधी आले; पण परिस्थिती ‘जैसे थे’!
कोरोना काळानंतर प्रशासक राज असताना येथील जनतेला वाटले होते की किमान सरकारी यंत्रणा तरी दखल घेईल. मात्र, तिथे निराशाच पदरी पडली. त्यानंतर मोठ्या गाजावाजात विद्यमान आमदार नी ड्रेनेज लाईन आणि रस्त्यासाठी भरघोस निधी दिला त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु, आजही प्रत्यक्षात जमिनीवर चित्र वेगळेच आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले ड्रेनेजचे काम पूर्ण व्हायला चार महिने लागले आणि आता गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे..
या विषयावर आमदारांनी ही लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..
मुख्य रस्ता अडवणे हा कायदेशीर गुन्हा; प्रशासनाचे दुर्लक्ष का?
मंगलमूर्ती नगरमध्ये येण्या-जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. काही प्लॉट धारक स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ता अडवत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. कायद्यानुसार, नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक रस्ता अडवणे हा **भारतीय न्याय संहिता (BNS)** आणि **महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांतर्गत** गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचे खळबळजनक सवाल:
रस्ता अडवणारे ‘बलिष्ठ’ की प्रशासन ‘हताश’? मंगलमूर्ती नगरच्या संयमाचा आता अंत..!”
शिरूर नगरपालिका क्षेत्रामध्येच असूनही मंगलमूर्ती नगरला सावत्र वागणूक का..?

हजारो रुपये टॅक्स भरूनही रस्ते, पाणी आणि ड्रेनेजसाठी विनवण्या का कराव्या लागतात..?
रस्ता अडवणाऱ्या भूमाफियांना प्रशासनाचे अभय आहे का..?
“आम्ही मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधी निवडून दिले, पण आमचा साधा रस्त्याचा प्रश्न सुटत नसेल तर दाद कोणाकडे मागायची? दोन महिने झाले रस्ता उखडून ठेवलाय, वृद्ध आणि मुलांना चालणे कठीण झाले आहे. आता फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे!
(स्थानिक रहिवासी, मंगलमूर्ती नगर.)





