क्राईम न्युज
Trending
पुणे जिल्ह्यातील शिरूर मध्ये टोळीयुद्धातून थरारक गँगवॉर.! कार अडवून फिल्मी स्टाईलने गोळीबार, दगडाने ठेचून एकाचा खून; परिसरात खळबळ..
भरदिवसा थरार! आधी कारचा अपघात घडवला, मग केला अंधाधुंद गोळीबार; एकाचा जागेवरच गेम, दोघे जखमी

शिरूर प्रतिनिधी (पुणे):
पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात सोमवारी (१ जून) सायंकाळच्या सुमारास एका थरारक आणि भीषण टोळीयुद्धाची (Gangwar) घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला असून, अंधाधुंद गोळीबार करत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय घडली.?
मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० ते ५:३० वाजण्याच्या सुमारास मौजे सरदवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीत न्हावरा फाटा ते न्हावरा जाणाऱ्या रोडवरील राजस्थान ढाब्यासमोर हा थरार घडला.
शिरूर येथील रहिवासी असलेले १) उमेश अनिल जगदाळे (वय २६), २) केदार झाडगे आणि ३) विशाल काळे (वय ३०) हे तिघेजण त्यांच्या टोयोटा टायझर कारमधून (क्र. MH 12 XQ 5104) न्हावरा बाजूकडून शिरूरकडे जात होते. याचवेळी न्हावरा फाट्याकडून न्हावरा गावाकडे जाणाऱ्या एका अज्ञात ‘किया सोनेट’ कारने (क्र. MH 14 LA 1128) टोयोटा टायझर कारला जोरात धडक (ठोस) दिली
कारवर ४ राऊंड फायर आणि पाठलाग
अपघात घडवून आणताच किया सोनेट कारमधून ४ ते ५ अज्ञात इसम खाली उतरले. त्यांनी काही समजण्याच्या आतच टोयोटा टायझर कारच्या पुढच्या काचेवर ४ राऊंड गोळीबार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरून कारमधील उमेश जगदाळे, केदार झाडगे आणि विशाल काळे हे तिघेही कारमधून उतरून जीवाच्या अकांताने पळू लागले.

मोटारसायकलवरून आले शूटर; दगडाने ठेचून खून..
हे तिघे पळत असतानाच, दबा धरून बसलेले आणखी दोन इसम एका मोटारसायकलवरून तेथे आले. त्यापैकी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी सनी यादव(रा. बकोरी फाटा, वाघोली) व त्याच्या साथीदारांनी पळणाऱ्या तिघांवर पुन्हा फायरिंग सुरू केली.
या हल्ल्यात आरोपींनी विशाळ काळे (वय ३०, रा. शिरूर) याला गाठले आणि त्याच्या तोंडावर मोठ्या दगडाने भीषण प्रहार केले. दगडाच्या गंभीर मारा मुळे विशाल काळे याचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. घटनास्थळी मृतदेहाजवळ पोलिसांना दोन रिकामी काडतुसे (Empty Cases) आणि रक्ताने माखलेले ४ ते ५ मोठे दगड आढळून आले आहेत.






