ताज्या घडामोडी
Trending

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त

मुख्य आरोपीवर खून, जबरी चोरी, विनयभंग आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

🔴 जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख २४ हजार रुपये; आरोपींना पोलीस कोठडी 

शिरूर (प्रतिनिधी): शिरूर पोलिसांनी अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी रात्री गस्तीदरम्यान शिरूर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय ३१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) हा व्यक्ती न्हावरे परिसरात पिस्तूल घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून मंडळ अधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून आरोपीला ताब्यात घेतले.

  • झडतीदरम्यान आरोपीच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर अधिक तपास केला असता आरोपीने बापू कोंडीबा पारखे (वय ३१, रा. सरदवस्ती, निमोणे, ता. शिरूर) याच्याकडे आणखी दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून तेही शस्त्रसाठे जप्त केले.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६१/२०२६ अंतर्गत शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना १८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे याच्याविरुद्ध यापूर्वीही खून, जबरी चोरी, विनयभंग आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे शिरूर व शिक्रापूर पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, पोलीस अंमलमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील, दादाराव नागरे शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

निर्भय न्यूज लाईव्ह पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये