क्रीडा व मनोरंजन
Trending

अजित आगरकर यांचा मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यकाळ संपला; गौतम गंभीरची भावूक पोस्ट – ‘इतिहास तुमच्याबाबत अधिक उदार राहील!’

अजित आगरकरांनंतर प्रज्ञान ओझा सांभाळणार बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्तेपदाची धुरा; प्रशिक्षक गंभीरकडून आगरकरांच्या योगदानाचा गौरव!

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा 

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला असून, आता यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही काळापासून आगरकर यांचा कार्यकाळ संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. अजित आगरकर यांच्यानंतर आता भारताचा माजी गोलंदाज प्रज्ञान ओझा मुख्य निवडकर्ता म्हणून ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.

अजित आगरकर यांच्या कार्यकाळ संपल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर एक विशेष आणि भावूक पोस्ट शेअर केली आहे.

गौतम गंभीरची सोशल मीडिया पोस्ट:

गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले,

 “प्रिय अजित भाई, तुमच्यासोबत काम करणे हा एक मोठा सन्मान होता. त्या तीन आयसीसी ट्रॉफी तुमच्या या विश्वासाची साक्ष आहेत की संघ नेहमीच प्रथम आला आणि त्याला नेहमीच प्राधान्य दिले गेले. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की इतिहास तुमच्याबाबत अधिक उदार राहील. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. तुमच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.”

यशाची साक्ष आणि महत्त्वपूर्ण निर्णय:

आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाने तीन मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. गंभीरने या यशाचे श्रेय केवळ ट्रॉफींच्या संख्येला न देता, वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघाला प्राधान्य देण्याच्या आगरकरांच्या भूमिकेला दिले आहे.

आगरकर यांचा कार्यकाळ अत्यंत वादळी आणि महत्त्वाच्या निर्णयांनी गाजलेला राहिला. संघ निवडीवर अनेकदा वादविवाद आणि प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवची टी-२० कर्णधारपदी झालेली नियुक्ती हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला. हार्दिकच्या दुखापतीचा इतिहास पाहता संघात सातत्याने उपलब्ध राहू शकेल अशा कर्णधाराची गरज असल्याने आगरकरांनी सूर्यकुमारवर विश्वास दाखवला होता. याव्यतिरिक्त टी-२० विश्वचषक जिंकूनही सूर्यकुमार यादवला संघातून वगळून श्रेयस अय्यरची थेट कर्णधार म्हणून केलेली निवडही गाजली होती.

जरी संघ निवडीवरून वाद झाले असले, तरी कालांतराने आगरकरांच्या निर्णयांचे मूल्यमापन त्यांच्या निकालांवरूनच केले जाईल, असा विश्वास गौतम गंभीरने व्यक्त केला आहे. आगरकरांच्या निर्भीड निर्णयांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवले, यात शंका नाही.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये