ताज्या घडामोडी
Trending

क्रीडा जगतात ‘ड्रॅगन’ची मोठी झेप: नियोजित सरकारी चौकटीच्या जोरावर चीनचे ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व; भारताकडूनही कडवी टक्कर!

आशियाई स्पर्धेतील भारतीय ॲथलीट्सची कामगिरी भविष्यातील यशाची पूर्वचिन्हे: ऑलिम्पिकच्या दृष्टीने कामगिरी महत्वाची– आदिल सुमारीवाला

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

निर्भय न्यूज लाईव्ह (Nirbhay News Live

क्रीडा विश्वात चीनचा दबदबा आणि भारताची जिद्दी लढत

ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात अमेरिकेने सर्वाधिक ६४४ सुवर्णपदके आणि सोव्हिएत संघाने ३९५ सुवर्णपदके जिंकली आहेत. मात्र, अलीकडच्या काळात चीनने या बलाढ्य देशांना जोरदार टक्कर दिली आहे. १९८४ पासून ऑलिम्पिकमध्ये चीनने २६३ सुवर्णपदके जिंकली असून पदकतालिकेत एकदा अव्वल, चार वेळा दुसरे स्थान, दोन वेळा तिसरे आणि चार वेळा चौथे स्थान पटकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे. चीनच्या या यशात डायव्हिंग, भारोत्तोलन, नेमबाजी, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स आणि बॅडमिंटन या खेळांचा ७५ टक्के वाटा आहे.

चीनचे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासत्तेत झालेले हे रूपांतर एका अचूक नियोजनबद्ध सरकारी प्रकल्पाचा परिणाम आहे. अमेरिकेसारख्या देशांचे यश महाविद्यालयीन यंत्रणा आणि खासगी क्लबवर अवलंबून असते, तर चीनने सरकारप्रणीत केंद्रीय चौकटीद्वारे लहान मुलांमधून प्रतिभा शोधून निवासी प्रशिक्षण केंद्रांमध्ये त्यांच्या सर्व खर्चासह तयारी करून घेतली आहे.

भारतही देतोय चीनला टक्कर

आशियाई स्पर्धेत भारत आणि चीनदरम्यान वैयक्तिक व सांघिक पातळीवर ११ सुवर्णपदकांसाठी लढाती झाल्या. त्यात चीनने ८, तर भारताने ३ सुवर्णपदकांच्या लढतीत चीनला पराभूत केले. चीनने भारताविरुद्ध नेमबाजीत आठपैकी चार सुवर्णपदके जिंकली. तर भारताने चीनविरुद्ध तिरंदाजीत तीनपैकी दोन सुवर्णपदके जिंकून आपली ताकद दाखवून दिली.

भविष्यातील यशाची पूर्वचिन्हे: ऑलिम्पिकवर भारताची नजर

जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना केवळ जिंकलेल्या पदकांचा विचार न करता, खेळाडूंच्या कामगिरीतील सुधाराचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे प्रवक्ते आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, “काही वैयक्तिक पदके गमावली असली तरी खेळाडूंच्या एकंदरीत कामगिरीबाबत आम्ही समाधानी आहोत. पदकांच्या एकूण टक्केवारीत ॲथलेटिक्सच्या खेळाडूंनी २८ टक्के वाटा उचलला आहे, याचा अभिमान वाटतो.”

ॲथलेटिक्समधील उत्कृष्ट कामगिरी:

 ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंनी १ सुवर्ण, ९ रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण २४ पदकांची कमाई केली.

स्पर्धेत ५ राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले, ज्यामध्ये विजेत्या रामराजच्या ‘४०० मीटर हर्डल्स’ शर्यतीतील विक्रमाचा विशेष उल्लेख आहे.

 ११ खेळाडूंनी वैयक्तिक सर्वोत्तम तर ३ खेळाडूंनी मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ३३ वेळा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले आहेत.

२४ पदकांव्यतिरिक्त ९ खेळाडूंनी चौथे, ८ खेळाडूंनी पाचवे आणि ६ खेळाडूंनी सहावे स्थान मिळवले.

भारतीय खेळाडूंची ही कामगिरी आगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि भविष्यातील यशाची नांदी ठरेल, असा विश्वास आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये