ताज्या घडामोडी
Trending

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलिसांचा दणदणीत रूट मार्च; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

निर्भय न्यूज लाईव्ह, शिरूर (प्रतिनिधी):

आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आज, १२ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातून जोरदार ‘रूट मार्च’ काढण्यात आला. सकाळी ११:०० ते ११:५० या वेळेत काढण्यात आलेल्या या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी अनुचित प्रकार घडवणाऱ्यांना कडक इशारा देत नागरिकांना भयमुक्त वातावरणाचा विश्वास दिला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी (शिरूर विभाग) मा. श्री. रवींद्र भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने या विशेष रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

असा होता रूट मार्चचा मार्ग

शिरूर पोलीस स्टेशन येथून रूट मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख आणि संवेदनक्षम भागांमधून म्हणजेच बस स्टँड, कापड बाजार, पाचकंदील चौक, रामआळी, बी.जे. कॉर्नर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, मारुती आळी, हलवाई चौक, सोनारआळी, कुंभारआळी, सिद्धार्थनगर आणि इंद्रानगर मार्गे रयत ग्राउंड येथे रूट मार्चची यशस्वी सांगता झाली.

७६ अधिकारी व जवानांचा सहभाग

या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (०१), पोलीस निरीक्षक (०१), पोलीस उपनिरीक्षक (०४), पोलीस अंमलदार (३०) आणि होमगार्ड (४०) असे एकूण ७६ पोलीस अधिकारी व अंमलदार पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन

गणेशोत्सव हा सण सर्वांनी अत्यंत उत्साहात, आनंदाने आणि शांततेच्या मार्गाने साजरा करावा. उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी शिरूर पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याचा स्पष्ट संदेश शिरूर पोलिसांच्या वतीने या प्रसंगी देण्यात आला.

 

— शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये