ताज्या घडामोडी
Trending

शनिश्चरी सर्वपित्री अमावस्या २०२६: पितृपक्षाचा महायोग; शनिदेवाच्या कृपेने दूर होईल पितृदोष आणि पीडा!

सर्वपित्री अमावस्येला शनिवारी विशेष महत्त्व; आठवणीने पठण करा 'हे' शक्तिशाली शनी स्तोत्र!

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

विशेष बातमी (निर्भय न्यूज लाईव्ह):

सर्वपित्री अमावस्या व शनिश्चरी अमावस्येचा दुर्मिळ महायोग

पितृपंधरवडा किंवा पितृपक्षाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. यंदाची सर्वपित्री अमावस्या शनिवारी, १० ऑक्टोबर २०२६ रोजी येत आहे. शनिवारी अमावस्या आल्याने धर्मशास्त्रात या तिथीला ‘शनिश्चरी अमावस्या’ असे विशेष स्थान प्राप्त झाले आहे. या दिवशी ज्ञात-अज्ञात अशा सर्व दिवंगत पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करून त्यांना तृप्त मनाने निरोप दिला जातो.

शनिदेवाच्या कृपेसाठी दानधर्म आणि स्तोत्र पठण

पितृपक्षात दानधर्माचे विशेष महत्त्व असतेच, परंतु शनिश्चरी अमावस्येच्या योगावर दानधर्म करणाऱ्या भक्तांवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. या दिवशी दानधर्मासोबतच विशेष शनी स्तोत्राचे पठण केल्यास कुंडलीतील शनी पीडा आणि दोषांपासून मुक्ती मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे.

॥ श्री शनी स्तोत्र ॥

> नमः कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च।

> नमः कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नमः॥

> नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।

> नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते॥

> नमः पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नमः।

> नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते॥

> नमस्ते कोटराक्षाय दुर्निरीक्ष्याय वै नमः।

> नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने॥

> नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते।

> सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च॥

> अधोदृष्टेः नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते।

> नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते॥

> तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च।

> नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नमः॥

> ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सुनवे।

> तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्॥

> देवाशुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगाः।

> त्वया विलोकिताः सर्वे नाशं यान्ति समूलतः॥

> प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे।

> एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबलः॥

स्तोत्राचा भावार्थ:

 स्वरूप व नमन: ज्यांच्या शरीराचा रंग कृष्ण (काळा) आणि भगवान शंकरांसारखा निळा आहे, अशा शनिदेवांना नमस्कार असो. जगासाठी कालाग्नि आणि कृतांताच्या रूपात आलेल्या शनिश्चराला नमन आहे.

 अद्भूत रूप: ज्यांचे शरीर मांसाहीन (अस्थिशेष) आहे, ज्यांची दाढी-मिशा आणि केस वाढलेले आहेत, ज्यांचे डोळे मोठे आणि पोट पाठीला चिकटलेले आहे अशा भयानक आणि उग्र रूप धारण करणाऱ्या शनिदेवाला वंदन आहे.

 दयाळू व अभयदाता: सूर्यपुत्र, भास्करपुत्र, अभय देणारे, मंद गतीने चालणारे आणि कश्यप ऋषींच्या वंशातील शनिदेव प्रसन्न झाल्यावर राज्य प्रदान करतात आणि कोपल्यावर सर्व काही नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. अशा भक्तवत्सल शनिदेवाने सर्वांवर आपली कृपा दृष्टि ठेवावी.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये