क्राईम न्युज
Trending
शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील १२ वर्षीय साईराज मांजरेची निर्घृण हत्या; समलिंगी संबंधाला विरोध की ..? पोलीस तपासात धक्कादायक खुलासे..!
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

शिरूर (पुणे): दिनांक १८/०३/२०२६
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मांजरेवस्ती येथे १२ वर्षीय शाळकरी मुलाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक तपासात समलिंगी संबंधाला विरोध केल्याने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असला, तरी ग्रामस्थांनी यामागे वेगळाच ‘ प्रकार असण्याची शक्यता वर्तवली आहे.

नेमकी घटना काय?
दहिवडी येथील मांजरेवस्तीत राहणारा साईराज गणेश मांजरे (वय १२) हा मंगळवारी (दि. १७ मार्च २०२६) सायंकाळी बेपत्ता झाला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दादाभाऊ मांजरे यांच्या विहिरीजवळ त्याचा मृतदेह अत्यंत संशयास्पद आणि अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. साईराज हा तळेगाव ढमढेरे येथील राय कुमार गुजर प्रशालेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. एका निष्पाप मुलाचा असा अंत झाल्याचे पाहून परिसरात शोककळा पसरली आहे.

समलिंगी संबंधाचा संशय आणि भावकीतीलच एकाला अटक.
शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास चक्रे फिरवून साईराजच्या भावकीतीलच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यास साईराजने विरोध केल्याने रागाच्या भरात या तरुणाने त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित तरुणाची सध्या कसून चौकशी सुरू असून हत्येचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामस्थांना”वेगळाच’ संशय…!
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. “जोपर्यंत आरोपीला पकडत नाही आणि तपासाची खात्री मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही,” अशी भूमिका नागरिकांनी घेतली. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्याने आणि ज्या पद्धतीने ही घटना घडली, त्यावरून हा वेगळाच’ प्रकार असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.




