ग्रामीण वार्ता
Trending

शिरूरमध्ये ग्रामपंचायत सदस्याच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉड अन् कोयत्याने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!

अडीच वर्षांच्या कार्यकाळावरून शिरूर ग्रामपंचायत मध्ये राजकीय वाद पेटला; पाषाण मळा येथे घरात घुसून कौटुंबिक मारहाण, शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

निर्भय न्यूज लाईव्ह (विशेष बातमी):

शिरूर (पुणे):

ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आणि सदस्य पदाच्या अडीच वर्षांच्या ठरलेल्या कार्यकाळावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शिरूर ग्रामीण भागातील पाषाण मळा परिसरात घडली आहे. दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मौजे शिरूर ग्रामीण येथील पाषाण मळा परिसरात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्य पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पद देण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी सचिन भाऊसाहेब घावटे, प्रथमेश धनंजय घावटे आणि ऋषिकेश शेलार यांनी फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला.

आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला घरातून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी सौ. सीमा सोमनाथ घावटे आणि त्यांचे दीर नितीन घावटे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. यावेळी आरोपी प्रथमेश घावटे याने हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या मुलावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र नवनाथ घावटे यांनी तत्परता दाखवत त्याचा हात धरल्याने मोठा अनर्थ टळला.

गाडी घटनास्थळी सोडून दुचाकीवरून पलायन

हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना असभ्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. परिसर तापल्याचे लक्षात येताच आरोपी स्वतःची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी घटनास्थळीच सोडून दुचाकीवरून पसार झाले.

तीन जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी सौ. सीमा सोमनाथ घावटे (वय ४० वर्षे, रा. पाषाण मळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०२६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) अन्वये आरोपी सचिन भाऊसाहेब घावटे, प्रथमेश धनंजय घावटे आणि ऋषिकेश शेलार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे शिरूर परिसरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

निर्भय सुविचार….!!!

प्रवास: खेळ अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये