ग्रामीण वार्ता
Trending
शिरूरमध्ये श्री म्हसोबा देवस्थान भंडारा उत्सवाचा उत्साह; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
हिंदू संमेलन आणि लोकसंगीताच्या सुरावटींनी रंगणार म्हसोबा देवाचा जत्रोत्सव!

शिरूर (प्रतिनिधी):
शिरूर येथील समस्त मंगलमूर्ती नगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही “श्री म्हसोबा देवस्थान भंडारा उत्सव २०२६” मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कार्यक्रमांची रूपरेषा:
या उत्सवाचा प्रारंभ शुक्रवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता *”संत निळोबाराय महिला भजनी मंडळ (पिंपळनेर)”यांच्या भजनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर रात्री ८:०० वाजता “हिंदू संमेलन व मार्गदर्शन'” हा विशेष कार्यक्रम पार पडणार असून, याद्वारे समाज प्रबोधन केले जाणार आहे.

शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत
‘स्वरार्वतक लोकसंगीताचा’ हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृतीचे दर्शन भाविकांना घडणार आहे.
म्हसोबा देवस्थान मंगलमूर्ती नगर.



